ETV Bharat / sports

'...अन् मी सलामीवीर बनलो', वाचा सचिनची कहाणी... - सचिन तेंडुलकर विषयी बातम्या

सचिनने एका मुलाखतीत सांगितले की, १९९४ साली न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीला उतरण्यासाठी मला संधी मिळावी, अशी विनंती मी संघ व्यवस्थापनाकडे केली. मात्र, सचिनला सलामीला संधी देण्यासाठी संघातील तेव्हाचे खेळाडू तयार नव्हते. पण सचिनचा हट्ट अखेर खरा ठरला आणि तो सलामीला उतरला आणि त्याने ८२ धावांची खेळी केली.

हात जोडले तेव्हा मला सलीमीची संधी मिळाली, सचिनने सांगितली स्टोरी
author img

By

Published : Sep 26, 2019, 5:49 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेट विश्वात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. १६ नोव्हेंबर २०१३ ला सचिनने आपल्या करियरमधील शेवटचा सामना वेस्ट इंडीजविरुध्द खेळत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषीत केली. अद्यापही सचिनची क्रेझ क्रिकेटप्रेमींमध्ये जशास तशी आहे. लाखो क्रिकेट रसिकांच्या मनात घर केलेल्या सचिनला सलामीला खेळण्यासाठी विनंती करावी लागली, ही बाब खुद्द सचिनने सांगितली.

सचिनने एका मुलाखतीत सांगितले की, '१९९४ साली न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीला उतरण्यासाठी मला संधी मिळावी, अशी विनंती मी संघ व्यवस्थापनाकडे केली. मात्र, सचिनला सलामीला संधी देण्यासाठी संघातील तेव्हाचे खेळाडू तयार नव्हते. पण सचिनचा हट्ट अखेर खरा ठरला आणि तो सलामीला उतरला आणि त्याने ८२ धावांची खेळी केली.

जेव्हा मी सलामीला सुरुवात केली, तेव्हा संघाचा कल हा सुरुवातीला विकेट वाचवण्याकडे होता. पण मी काहीतरी वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. सलामीला फलंदाजीला येऊन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे, अशी माझी योजना होती. याच दृष्टीने मी खेळ केला, असे सचिनने सांगितले.

सचिनचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला आणि भारतीय संघाला एक धडाकेबाज सलामीवीर मिळाला. दरम्यान, सचिनने त्या सामन्यात सलामीला येऊन ४९ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. त्यानंतरही त्याने लागोपाठ सामन्यात सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी पार पाडली. यामुळे त्याचा सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला.

सचिनने या विनंती दरम्यान जर मी या भूमिकेत अयशस्वी झालो. तर मी पुन्हा कधीही तुमच्या पुढे येणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र, सचिनने जबाबदारीने खेळ करत सलामीवीरची भूमिका चोख पार पाडली. यासाठी त्याला जास्ती जास्त तास नेटमध्ये सराव करावा लागत होता, असेही त्याने सांगितले.

हेही वाचा - टीम इंडिया श्रीलंका विरुध्द नव्या वर्षाची करणार सुरुवात, 'असा' आहे वेळापत्रक

हेही वाचा - टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव; दीप्तीचा भन्नाट स्पेल, ४ षटके, ३ निर्धाव आणि ३ गडी बाद

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.