नवी दिल्ली - आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाचा फलंदाज सरफराज अहमदला संघातून डच्चू देण्यात आला आहे. कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सरफराजची गच्छंती अटळ मानली जात होती. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा - फॉलोऑन देण्याच्या विक्रमात विराटच किंग
लंकेविरूद्धच्या मालिकेत झालेल्या दारूण पराभवामुळे सरफराजची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने ट्विटरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली. सरफराजऐवजी मोहम्मद रिझवानला कसोटी आणि टी-२० संघात यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
-
Pakistan names exciting young fast bowling stars Musa and Naseem for Australia Tests
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More ▶️ https://t.co/W2J7CSdTl6#AUSvPAK pic.twitter.com/A3fXJN0Ajg
">Pakistan names exciting young fast bowling stars Musa and Naseem for Australia Tests
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 21, 2019
More ▶️ https://t.co/W2J7CSdTl6#AUSvPAK pic.twitter.com/A3fXJN0AjgPakistan names exciting young fast bowling stars Musa and Naseem for Australia Tests
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 21, 2019
More ▶️ https://t.co/W2J7CSdTl6#AUSvPAK pic.twitter.com/A3fXJN0Ajg
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधार नेमले आहेत. बाबर आझमला टी-२० चे कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर, सोटी संघाचे कर्णधारपद अझहर अलीकडे सोपवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी, सरफराजला संघाबाहेर काढतील असे मत पाकचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले होते.