ETV Bharat / sports

सचिनच्या इंडिया लिजेड्ने जिंकली रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धा, साराने केलं हटके सेलिब्रेशन - सचिन तेंडुलकर न्यूज

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात इंडिया लिजेड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे विजेतेपद पटकावले. इंडिया लिजेड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेड्सचा पराभव केला. सचिनची लाडकी लेक साराने या विजयाचे सेलिब्रेशन केले.

sara tendulkar celebrated after sachin tendulkar led india legends won road safety world series
सचिनच्या इंडिया लिजेड्ने जिंकली रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धा, साराने केलं हटके सेलिब्रेशन
author img

By

Published : Mar 22, 2021, 7:55 PM IST

मुंबई - भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात, इंडिया लिजेड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे विजेतेपद पटकावले. इंडिया लिजेड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेड्सचा पराभव केला. सचिनची लाडकी लेक साराने या विजयाचे सेलिब्रेशन केले.

रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सचिनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने तिलकरत्ने दिलशानच्या संघाला १४ धावांवी पराभव केला. रायपूरच्या शहीद वीर नारायणसिंह इंटरनॅशन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इंडिया लिजेड्सने बाजी मारली.

अंतिम सामना संपल्यानंतर सारा तेंडुलकरने इंन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यात सचिन टीव्हीवर पाहायला मिळत आहे. साराने इंन्स्टाग्रामपर अंतिम सामन्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या स्टोरीवर तिने 'Yay' असे लिहलं आहे. दरम्यान, सचिनची मुलगी सारा क्रिकेटची चाहती आहे. ती अनेकदा क्रिकेट सामने पाहण्यासाठी मैदानावर आली आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या अंतिम सामन्यात युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली. या दोघांनी अतिरिक्त धावा जमवल्या. तर श्रीलंकेकडून सनथ जयसुर्या आणि दिलशान यांनी शानदार प्रदर्शन केले. युसूफने ३६ चेंडूत ६२ धावांची ताबडतोड खेळी केली. तर युवराजने ४१ चेंडूत ६० धावा तडकावल्या. या दोघांच्या खेळीमुळे इंडिया लिजेड्सने ११ षटकात ३ बाद ७८ वरून २० षटकात ४ बाद १८१ धावांची मजल मारली होती.

हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर

हेही वाचा - Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.