ETV Bharat / sports

लाळ बंदीचा मर्यादित षटकाच्या सामन्यावर जाणवणार नाही परिणाम - दिनेश कार्तिक - दिनेश कार्तिक न्यूज

आयसीसीच्या लाळे संदर्भातील नियमाचा आयपीएल आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये फारसा परिणाम जाणवणार नाही. रेड चेरी चेंडूचा वापर करून कसोटी खेळल्यास याचा परिणाम दिसेल, असे मत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केले आहे.

Dinesh Karthik
दिनेश कार्तिक
author img

By

Published : Jun 11, 2020, 5:59 PM IST

कोलकाता - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच खेळण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर आयसीसीने बंदी घातली आहे. हा नियम मर्यादित षटकांच्या सामन्यात फारसा प्रभावी ठरणार नाही मात्र, कसोटी सामन्यांमध्ये गोलदांजांना या नियमाचा नक्कीच फटका बसेल, असे मत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केले आहे.

आयसीसीच्या लाळे संदर्भातील नियमाचा आयपीएल आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये फारसा परिणाम जाणवणार नाही. रेड चेरी चेंडूचा वापर करून कसोटी खेळल्यास याचा परिणाम दिसेल, असे इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)मध्ये कोलकाता संघाचा कर्णधार असलेल्या कार्तिकने म्हटले आहे.

दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक

अम्फान चक्रीवादळाने बाधित झालेल्या लोकांसाठी केकेआरच्या पुढाकाराने 'केकेआर साहित्य वहन' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या ऑनलाईन उद्घाटनानंतर पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्तिकने संवाद साधला.

सुरुवातीच्या २०-३० षटकांपर्यंत चेंडू नवीन असतो त्यामुळे त्याला स्विंग करण्यात अडचण येत नाही. बहुतांशी क्रिकेट मैदानांची रचनाही यासाठी उपयुक्त आहे. मात्र, चेंडू जूना झाल्यानंतर लाळ न लावता स्विंग मिळवणे गोलंदाजांना कठीण जाईल, असे कार्तिक म्हणाला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होणारे आयपीएल खेळवले गेले नाही. आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. जर त्यांनी तिसरे विजेतेपजद पटकावले तर बक्षिसाची सर्व रक्कम अम्फान चक्रीवादळाने बाधित झालेल्या नागरिकांसाठी दिली जाईल, असेही कार्तिकने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.