ETV Bharat / sports

सचिन मुलासाठी बनला हेअरस्टायलिस्ट, व्हिडीओ व्हायरल - सचिन तेंडुलकर

काही दिवसांपूर्वी भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर घरीच केस कापताना दिसून आला. त्याने केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. आता सचिनने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो मुलगा अर्जुनचे केस कापताना दिसत आहे.

Sachin Turns Hair-stylist For Son Arjun video viral on social media
सचिन मुलासाठी बनला हेअरस्टायलिस्ट, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : May 19, 2020, 8:00 PM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून देशातील लॉकडाऊन अजूनही कायम ठेवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये केशकर्तनालय बंद आहेत. यामुळे आपापल्या घरीच असलेल्या नागरिकांना घरीच केस कापावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर घरीच केस कापताना दिसून आला. त्याने केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. आता सचिनने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो मुलगा अर्जुनचे केस कापताना दिसत आहे.

सचिनने हा व्हिडीओ शेअर करताना, एक बाप म्हणून सगळे यायला हवे. मुलांसोबत खेळणे असो, व्यायाम करणे असो किंवा त्यांचे केस कापणे असो, असे कॅप्शन दिले आहे. हेअरकट कसाही झालेला असला तरी अर्जुन तू नेहमी 'हॅन्डसम'च दिसतो. माझी हेअरस्टायलिस्ट असिस्टंट साराने अर्जुनचे केस कापण्याच्या कामी मदत केल्याने तिचे आभार, असेही सचिनने म्हटले आहे.

अर्जुनसाठी हेअर स्टायलिस्ट बनलेल्या सचिनला सारा मार्गदर्शन करत आहे. या व्हिडिओमध्ये साराचा फक्त आवाज येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी साराने खास सचिनसाठी एक डिश तयार केली होती. ती डिश सचिनने अवघ्या ६० सेंकदात फस्त केली होती.

हेही वाचा - चेतेश्वर पुजाराचा पत्नीकडून हेअरकट! ..फोटोला दिले मजेशीर कॅप्शन

हेही वाचा - मायकल जॉर्डनच्या बुटाचा लिलाव, 'इतक्या' कोटींची लागली बोली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.