मुंबई - भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. सचिनने घरी राहून कुटुंबासाठी 'आंब्याची (मँगो) कुल्फी' तयार केली. कुल्फी तयार करतानाचा व्हिडिओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
''लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त खास भेट. कुटुंबीयांसाठी मँगो कुल्फी'', असे सचिनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 1990 मध्ये सचिन आणि अंजली पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. 24 मे 1995 रोजी त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.
- View this post on Instagram
Made this Mango Kulfi as a surprise for everyone at home on our 25th wedding anniversary. 🥭 ☺️
">
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून देशातील लॉकडाऊन अजूनही कायम ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो मुलगा अर्जुनचे केस कापताना दिसत होता.
कोराना विरूद्धच्या लढाईत सचिनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुरुवातीला त्याने 50 लाखाची मदत दिली होती. त्यानंतर त्याने पाच हजार लोकांच्या रेशनची व्यवस्था केली होती. त्यानंतर कोरोना संकटातील आर्थिकदृष्ट्या असुरक्षित अशा 4000 लोकांना सचिनने मदत केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (बीएमसी) मुलांचा समावेश आहे. सचिनने ही देणगी मुंबईस्थित ना-नफा न देणारी संस्था 'हाय फाइव्ह यूथ' फाउंडेशनला दिली आहे.