मुंबई - माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला धावून आला आहे. कोरोना संकटातील आर्थिकदृष्ट्या असुरक्षित अशा 4000 लोकांना सचिनने मदत केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (बीएमसी) मुलांचा समावेश आहे. सचिनने ही देणगी मुंबईस्थित ना-नफा न देणारी संस्था 'हाय फाइव्ह यूथ' फाउंडेशनला दिली आहे.
संस्थेने या मदतीविषयी सचिनचे ट्विटरवर आभार मानले आहेत. "धन्यवाद सचिन, खेळ करुणास प्रोत्साहित करतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवून दिले! आमच्या कोरोना फंडात आपण दिलेली देणगी आम्हाला 4000 असुरक्षित लोकांना आर्थिक सहाय्य करेल. यामध्ये बीएमसी शाळेतील मुलांचाही समावेश असून या नवोदित खेळाडूंनी तुमचे आभार मानले आहेत", असे या संस्थेने ट्विटरवर म्हटले.
47 वर्षीय सचिननेही संस्थेच्या प्रशंसनीय कार्याबद्दल अभिनंदन केले. सचिन म्हणाला, “रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.”
कोराना विरूद्धच्या लढाईत सचिनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुरुवातीला त्याने 50 लाखाची मदत दिली होती. त्यानंतर त्याने पाच हजार लोकांच्या रेशनची व्यवस्था केली होती.