हैदराबाद - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने आपला मित्र विनोद कांबळी याला एक चॅलेंज दिले आहे. सचिनने हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्याला एक आठवड्याचा अवधी दिला आहे. हे चॅलेंज जर त्याने आठवड्याभरात पूर्ण केले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार झाला आहे.
काय आहे सचिनचे चॅलेंज -
सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणे तयार केले होते. त्या गाण्याचे बोल 'क्रिकेटवाली बीट पे' असे होते. या गाण्यात सचिन कोणा-कोणाबरोबर क्रिकेट खेळला आहे, तसेच तो कशाप्रकारे फटके लगावतो, हे दाखवण्यात आले होते. हे गाणं सोनूसोबत सचिननेही गायले आहे. आता हेच गाणं रॅप पद्धतीने गाण्याचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले आहे.
-
Mr. Kambli, I challenge you to do the rap of my song #CricketWaliBeat!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
You have 1 week. 😜 @vinodkambli349 pic.twitter.com/8zU1tVG0mh
">Mr. Kambli, I challenge you to do the rap of my song #CricketWaliBeat!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 21, 2020
You have 1 week. 😜 @vinodkambli349 pic.twitter.com/8zU1tVG0mhMr. Kambli, I challenge you to do the rap of my song #CricketWaliBeat!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 21, 2020
You have 1 week. 😜 @vinodkambli349 pic.twitter.com/8zU1tVG0mh
सचिनने या गाण्याला रॅप पद्धतीने गाण्यासाठी कांबळीला एक आठवड्याची मुदत दिली आहे. जर या आठवड्याभरात कांबळीने हे गाणे व्यवस्थित गायले, तर त्याला सचिन हवे ते द्यायला तयार आहे.
दरम्यान, सचिन-सोनुच्या या गाण्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता कांबळी या गाण्याचं रॅप वर्जन कशाप्रकारे गाणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, यासाठी आपल्याला एक आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा - धवनच्या जागी संजू सॅमसन..तर, पृथ्वी करणार वनडे संघात पदार्पण
हेही वाचा - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आफ्रिकेनं केलं कर्णधार