ETV Bharat / sports

मास्टरब्लास्टर सचिनचा आयसीसीला डीआरएससंदर्भात 'महत्त्वाचा' सल्ला

सचिन ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये म्हणाला, ''जर कॅमेरामध्ये चेंडू स्टम्पला स्पर्श केलेला दाखवत असेल, तर फलंदाज बाद होणे आवश्यक आहे.'' या व्हिडिओमध्ये सचिन वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराशी डीआरएस प्रणालीविषयी चर्चा करताना दिसत आहे.

sachin tendulkar advised icc to change rules on drs sought for lbw
मास्टर ब्लास्टर सचिनचा आयसीसीला डीआरएससंदर्भात 'महत्त्वाचा' सल्ला
author img

By

Published : Jul 12, 2020, 2:34 PM IST

Updated : Jul 12, 2020, 2:53 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आयसीसीला एक सल्ला दिला आहे. एलबीडब्ल्यूसाठी मागितलेल्या डीआरएसवरील नियम बदलण्यासाठी त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

  • What % of the ball hits the stumps doesn’t matter, if DRS shows us that the ball is hitting the stumps, it should be given out, regardless of the on-field call. That's the motive of using technology in Cricket. As we know technology isn’t 100% right but neither are humans.#ENGvWI pic.twitter.com/8At80AtRs5

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ''जर कॅमेऱ्यामध्ये चेंडू स्टम्पला स्पर्श केलेला दाखवत असेल, तर फलंदाज बाद होणे आवश्यक आहे.'' या व्हिडिओमध्ये सचिन वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराशी डीआरएस प्रणालीविषयी चर्चा करताना दिसत आहे.

लाराशी बोलताना तो म्हणाला, ''आयसीसीच्या या निर्णयाशी मी सहमत नाही. हा नियम आयसीसी बर्‍याच काळापासून वापरत आहे.'' सध्या एलबीडब्ल्यूच्या डीआरएस प्रणालीतील नियमांनुसार, जर पंचाने फलंदाजाला बाद दिले नसेल, विरोधी संघाने डीआरएसकडे विचारणा केली असेल आणि किमान 50%पेक्षा जास्त चेंडू स्टम्पला स्पर्श करत असेल, तर पंचांचा निर्णय बदलला जाऊ शकतो. मात्र, असे नाही झाले तर तो निर्णय 'अंपायर्स कॉल' म्हणून तसाच राहतो.

जर निर्णय 'अंपायर्स कॉल' असेल, तर विरूद्ध संघाचा तो डीआरएस वाया जात नाही. मात्र, फलंदाजालाही बाद दिले जात नाही. त्याचवेळी, जेव्हा फलंदाज डीआरएससाठी विचारतो तेव्हादेखील फलंदाजी करणाऱ्या संघाचा डीआरएस कायम राहतो.

Last Updated : Jul 12, 2020, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.