नवी दिल्ली - दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने फलंदाज सुरेश रैनाचे दुसऱ्यांदा 'बाप' झाल्याबद्दल अभिनंदन केले. मंगळवारी सचिनने ट्विटरद्वारे रैनाला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - IPL २०२० रद्द ? बीसीसीआय-फ्रँचायझी बैठक कॅन्सल, संघमालक म्हणाले, IPL नाही झालं तरी ठीक...
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज तथा 'मिस्टर आयपीएल'च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने सोमवारी गोंडस मुलाला जन्म दिला. या आनंदाच्या बातमीनंतर अनेकांनी रैनाला शुभेच्छा दिल्या. त्यात सचिनही सहभागी झाला. पाहा सचिनने केलेले ट्विट -
सुरेश-प्रियांकाला २०१६ मध्ये मुलगी झाली होती आणि तिचे नाव गार्सिया असे ठेवण्यात आले. त्यानंतर आता २०२० मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. कोरोना विषाणूच्या गंभीर वातावरणात रैनासह त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरली.
कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे. सुरुवातीला ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होईल, असे बीसीसीआयने सांगितले. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल १५ एप्रिलापासून होईल, असे दिसत नाही.