वेलिंग्टन - न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये १०० सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस निमंत्रण दिले आहे.
हेही वाचा - रहाणे म्हणतो, 'या'कारणाने न्यूझीलंड प्रबळ दावेदार
टेलरने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत आपला १०० वा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने किवी संघाकडून २३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कसोटीत ७१७४धावा आणि एकदिवसीय सामन्यात ८५७० धावा केल्या आहेत. टेलरने न्यूझीलंडसाठी १०० टी-२० सामन्यांत १९०९ धावा केल्या असून माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम आणि मार्टिन गप्टिल यांच्या तो मागे आहे.
'मला वाटते की मी अजूनही या संघासाठी पात्र आहे. मी अजूनही चांगले क्षेत्ररक्षण करत असून धावांसाठी भूकेला आहे. मला यातून आनंद मिळतो', असे टेलरने म्हटले आहे. ३५ वर्षीय टेलरने २००६ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.