अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पिंक बॉल कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरून बराच वाद झाला. तेव्हा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने टीका करणाऱ्यांना फैलावर घेतले होते. आता उभय संघात चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादमध्येच होणार आहे. यासामन्याआधी रोहितने एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत टीका करणाऱ्यांवर पुन्हा निशाना साधला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशीच लागला. भारताने हा सामना १० गडी राखून जिंकला. त्यानंतर स्टेडियमच्या खेळपट्टीवरून बराच वाद झाला होता. आता रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रोहित मैदानावर झोपलेला दिसत आहे. रोहितने हा फोटो शेअर करताना त्याला कॅप्शन लिहले आहे की, विचार करतोय की चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रोहितची ही पोस्ट म्हणजे तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना उत्तर असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, रोहितने दुसरी कसोटी संपल्यानंतर खेळपट्टीबाबत त्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक संघ घरच्या मैदानाचा फायदा घेत असते. तसे नसेल तर आयसीसीने एक नियम तयार करावा आणि भारतात आणि भारता बाहेर सारखीच खेळपट्टी तयार करण्यात यावी, असे मत त्याने व्यक्त केले होते.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. तर त्यानंतरचे दोन सामने भारताने जिंकत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील चौथा आणि अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबाद स्टेडियमवर होणार आहे.