ETV Bharat / sports

Video : लॉकडाऊनमध्ये लाडक्या समायरासोबत रोहित शर्माची धमाल मस्ती - रोहित शर्माची पत्नी

रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर समायरासोबत खेळतानाचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात समायरा आपल्या बाबांसोबत खेळताना हसताना दिसत आहे. रोहितही आपल्या मुलीसोबत खेळताना अगदी लहान झाल्यासारखा दिसत आहे. रोहितने या व्हीडिओ, हे दिवस कधीही परत येणार नाहीयेत.. असे कॅप्शन दिले आहे.

Rohit Sharma shares adorable video with daughter Samaira
Video : लॉकडाऊनमध्ये लाडक्या समायरासोबत रोहित शर्माची धमाल मस्ती
author img

By

Published : Jun 8, 2020, 7:46 AM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सर्व खेळाडू आपापल्या घरी कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. रोहित शर्माही या काळात सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह आहे. त्याने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मुलगी समायरासोबत खेळताना दिसत आहे.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर समायरासोबत खेळतानाचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात समायरा आपल्या बाबांसोबत खेळताना हसताना दिसत आहे. रोहितही आपल्या मुलीसोबत खेळताना अगदी लहान झाल्यासारखा दिसत आहे. रोहितने या व्हीडिओ, हे दिवस कधीही परत येणार नाहीयेत.. असे कॅप्शन दिले आहे.

रोहित याआधीही मुलगी समायरासोबत खेळताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. तो एका सामन्यादरम्यान, दुसऱ्या प्रेक्षक स्टँडमध्ये पत्नी रितिका हिच्यासह बसलेल्या समायराला हातवारे करुन खेळवतानाही पाहायला मिळाले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

रितिका सचदेव ही रोहितची व्यवस्थापक म्हणून काम करत होती. रोहितच्या सर्व नोंदी ती ठेवत होती. दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यामुळे त्यांच्या आवडी-निवडी एकमेकांना माहिती होत्या. यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे एक चांगले नाते तयार झाले होते. कारण दोघे बराच काळ एकत्र असायचे. यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि रोहितने फिल्मी अंदाजात गुडघ्यावर बसून रितिकाला प्रपोज केले होते. त्यावेळी रितिकानेही रोहितला होकार दिला होता.

रोहित आणि रितिका यांनी १३ डिसेंबर २०१५ साली मुंबईतील ताज लँड्स या हॉटेलमध्ये लग्न केले. यावेळी क्रिकेटपटू आणि बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी आले होते. ३० डिसेंबर २०१९ रोजी रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये सचिन मारतोय दोरीउड्या!...पाहा व्हिडिओ

हेही वाचा - आयपीएल-२०२० भारताबाहेर..? युएई क्रिकेट बोर्ड आयोजन करण्यास तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.