ETV Bharat / sports

संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय! - rohit sharma social media bio

रोहितला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

rohit sharma remove indian cricketer from social media bio
संघाबाहेर केल्यानंतर रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय!
author img

By

Published : Oct 27, 2020, 7:23 PM IST

दुबई - ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघात स्थान न मिळाल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्माने आपल्या ट्विटर व इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोवरून ''भारतीय क्रिकेटपटू'' हा टॅग काढून टाकला आहे. सोमवारी, बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताची एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी संघांची घोषणा केली. यात रोहित शर्माला एकाही संघात स्थान दिलेले नाही.

रोहितला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईशांत शर्माचेही संघात नाव नाही. वैद्यकीय पथक रोहित आणि ईशांतवर लक्ष ठेवतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. याबद्दल सुनील गावसकर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.

असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा -

आयपीएल २०२० स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ -

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.