मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील ६ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक देश आपआपल्या परीने या विषाणुशी झुंज देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने एक व्हिडिओ संदेश जारी करत साऱ्यांना खास संदेश दिला आहे.
रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सद्याचे दिवस आपण सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजुबाजूला काय चालले आहे, यावर आपले बारीक लक्ष असले पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास, त्याने त्वरीत जवळच्या रुग्णालयाला कळवले पाहिजे, असा संदेश रोहितने व्हिडिओच्या माध्यमातून दिला.
-
Stay safe everyone. pic.twitter.com/2ABy1XUeTP
— Rohit Sharma (@ImRo45) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Stay safe everyone. pic.twitter.com/2ABy1XUeTP
— Rohit Sharma (@ImRo45) March 16, 2020Stay safe everyone. pic.twitter.com/2ABy1XUeTP
— Rohit Sharma (@ImRo45) March 16, 2020
कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. तसेच या आजारात जीव गमावलेल्या कुटुंबीयांप्रती मला दु:ख आहे, असे रोहित व्हिडिओमध्ये म्हणतो.
दरम्यान, याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही कोरोना विषयावरून खंबीर राहा, घाबरून जाऊ नका आणि कणखर राहा, आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या धसका : दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकातामार्गे मायदेशी परतणार
हेही वाचा - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे पाकिस्तानात तुफानी शतक..पाहा व्हिडिओ