मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तर कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघात असणार आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.
मागील आठवड्यात निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. यात रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत संपूर्ण दौऱ्यातून वगळण्यात आले होते. विशेष म्हणजे, ज्या दिवशी संघाची घोषणा करण्यात आली, त्या दिवशी सायंकाळी रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना पाहायला मिळाला. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भात तातडीची एक बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात त्यांनी रोहित शर्माचाी निवड कसोटी मालिकेसाठी केली आहे. याविषयी बीसीसीआयने सांगितले की, रोहितशी दुखापतीविषयी चर्चा करण्यात आली. तसेच फिजिओचा रिपोर्ट पाहिला. त्यानुसार, रोहित दुखापतीतून संपूर्णपणे सावरावा, यासाठी त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे. याशिवाय बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी यष्टीरक्षक संजू सॅमसनला भारतीय संघात घेतले आहे.
भारताचा सुधारित संघ
टी-20 - विराट कोहली (कर्णधार) , शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर आणि टी नटराजन.
एकदिवसीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसन.
कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा