ETV Bharat / sports

युवराजच्या मार्गदर्शनामुळेच धावा करु शकलो; रोहित शर्माची कबुली - yuvraj singh

विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी युवराज आणि मी एकत्रित मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल खेळलो. या आयपीएलमध्ये माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. तेव्हा युवराजने मला तु धावा काढू शकतोस असा विश्वास दिला. कदाचित युवराज आगामी विश्वकरंडक स्पर्धेविषयी मला सांगत होता. त्याच्या या विश्वासामुळे मी धावा जमवू शकलो. असे रोहित शर्माने सांगितले.

मोठ्ठा भाऊ युवराजच्या 'अनमोल' सल्ल्यानेच धावा करु शकलो; रोहित शर्माची कबुली
author img

By

Published : Jul 7, 2019, 9:27 PM IST

Updated : Jul 8, 2019, 3:56 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्माने 5 शतके ठोकली आहेत. तो सद्या आपल्या कार्यकिर्दमधील सर्वश्रेष्ठ फार्ममध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या यशाचे मागे 2011 सालचा 'मालिकावीर' युवराज असल्याची कबुली रोहित शर्माने दिली आहे. युवराजने केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी धावा करु शकलो. असे रोहितने श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यानंतर आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले.

विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी युवराज आणि मी एकत्रित मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल खेळलो. या आयपीएलमध्ये माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. तेव्हा युवराजने मला तु धावा काढू शकतोस असा विश्वास दिला. कदाचित युवराज आगामी विश्वकरंडक स्पर्धेविषयी मला सांगत होता. त्याच्या या विश्वासामुळे मी धावा जमवू शकलो. असे रोहित शर्माने सांगितले.

युवराज माझ्या थोरल्या भावासारखा असून त्याने मला नेहमी योग्य सल्ला दिला. मी आणि तो, खेळ असो की व्यक्तीगत जीवन सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो. आयपीएलमध्ये माझ्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. तसेच काही दिवसातच विश्वकरंडक सुरू होणार होते. तेव्हा युवराजने मला शांत राहण्याचा सल्ला दिला. असंही रोहित म्हणाला.

मुंबई इंडियन्सने जरी आयपीएल स्पर्धा जिंकली तरी रोहित शर्माला अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या रोहित शर्माला युवराजने धीर देत तु धावा करु शकतोस, असा विश्वास बोलून दाखवला. तसेच युवराजने मी सुध्दा 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत असेच केल्याचे रोहितला सांगितले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 8, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.