मुंबई - स्पॅनिश लीग ला-लीगाचे 34 वे विजेतेपद जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे अभिनंदन केले. रियल माद्रिदने विला रियालचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
"रियल माद्रिदच्या पदरात आणखी एक शीर्षक. रियल माद्रिद या कठीण काळात नक्कीच एक संघ म्हणून उदयास आला आहे. अभिनंदन. या वर्षाच्या शेवटी एक चांगली बातमी मिळाली", असे रोहितने ट्विटरवर म्हटले.
-
Another title in the bag. Real Madrid truly came together as a team during these tough times. Congratulations! Finally some good news in a year that is severely lacking any. #No34 #HalaMadrid @LaLiga @realmadrid pic.twitter.com/Pbake4efQq
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Another title in the bag. Real Madrid truly came together as a team during these tough times. Congratulations! Finally some good news in a year that is severely lacking any. #No34 #HalaMadrid @LaLiga @realmadrid pic.twitter.com/Pbake4efQq
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2020Another title in the bag. Real Madrid truly came together as a team during these tough times. Congratulations! Finally some good news in a year that is severely lacking any. #No34 #HalaMadrid @LaLiga @realmadrid pic.twitter.com/Pbake4efQq
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2020
माद्रिदचे हे सलग तिसरे ला-लीगा जेतेपद आहे. करीम बेंझेमाच्या दुहेरी गोलमुळे माद्रिदने हा विजय नोंदवला. त्याने 29 व्या मिनिटाला पहिला, तर 77 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. विला रियालकडून विसेंटा इबोराने 83 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. प्रशिक्षक झिदानच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
कोरानामुळे सर्व प्रकारचे उपक्रम थांबले आहेत. दरम्यान काही देशांमधील फुटबॉल लीगला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचवेळी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मालिकेसह क्रिकेटचेही पुनरागमन झाले आहे.