ETV Bharat / sports

कोलकाताविरुद्ध मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने साजरे केले अनोखे 'दीडशतक' - wankhede stadium

आयपीएलच्या याच मोसमात सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईसाठी खेळताना १५० सामन्यांचा टप्पा पूर्ण केलाय

रोहित शर्मा
author img

By

Published : May 6, 2019, 11:16 PM IST

मुंबई - साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात कोलाकातावर मुंबईने शानदार विजय मिळवत आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतलीय. वानखेडे मैदानावर कोलाकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्मा
रोहित शर्मा

कोलाकाताविरुद्ध खेळण्यात आलेला सामना हा रोहित शर्माचा मुंबईसाठी खेळतानाचा १५० वा सामना ठरला. याच मोसमात सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईसाठी खेळताना १५० सामन्यांचा टप्पा पूर्ण केला होता.

खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १३३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माची ५५ धावांच्या अर्धशतकी आणि सूर्यकुमार यादवच्या ४६ धावांच्या जोरावर मुंबईने ९ गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजीत मुंबईकडून लसिथ मलिंगाने सर्वाधिक ३ बळी घेतलेत.

Intro:Body:

spo news 005

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.