ETV Bharat / sports

रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे शिखर गाठताना हिटमॅनने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. रोहितने २१७ व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करण्यासाठी गांगुलीला २२८ तर, सचिनला २३५ डाव खेळावे लागले होते.

Rohit Sharma breaches the 9K mark in ODIs
रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण
author img

By

Published : Jan 19, 2020, 8:00 PM IST

बंगळुरू - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक लढतीत रोहित शर्मा याने मोठी कामगिरी नोंदवली. हिटमॅन रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील ९ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच षटकात फलंदाजी करताना रोहितने हा विक्रम केला आहे.

हेही वाचा - जॉन्टी ऱ्होड्स म्हणतो, 'बॉलिवूडचा 'हा' चित्रपट पाहून अंगावर शहारे आले'

एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे शिखर गाठताना हिटमॅनने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. रोहितने २१७ व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करण्यासाठी गांगुलीला २२८ तर, सचिनला २३५ डाव खेळावे लागले होते.

शिवाय, रोहित शर्मा ७ हजार एकदिवसीय धावा करणारा वेगवान सलामीवीर फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ४२ धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. रोहितने १३७व्या डावात सलामीवीर म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ९ हजार धावा ठोकणारे खेळाडू -

  • विराट कोहली (भारत) - १९४ डाव.
  • एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका) - २०५ डाव.
  • रोहित शर्मा (भारत) - २१७ डाव.
  • सौरव गांगुली (भारत) - २२८ डाव.
  • सचिन तेंडुलकर (भारत) - २३५ डाव.
  • ब्रायन लारा (वेस्ट इंडीज) - २३९ डाव.

Intro:Body:

रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण

बंगळुरू - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक लढतीत रोहित शर्मा याने मोठी कामगिरी नोंदवली. हिटमॅन रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील ९ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच षटकात फलंदाजी करताना रोहितने हा विक्रम केला आहे.

हेही वाचा -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे शिखर गाठताना हिटमॅनने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. रोहितने २१७ व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करण्यासाठी गांगुलीला २२८ तर, सचिनला २३५ डाव खेळावे लागले होते.

शिवाय, रोहित शर्मा ७ हजार एकदिवसीय धावा करणारा वेगवान सलामीवीर फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ४२ धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. रोहितने १३७व्या डावात सलामीवीर म्हणून ७ हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करण्यासाठी अमलाने १४७ डाव खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने १६० डावात ही कामगिरी केली होती.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ९  हजार धावा ठोकणारे खेळाडू -

विराट कोहली (भारत) - १९४ डाव

एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका) - २०५ डाव

रोहित शर्मा (भारत) - २१७ डाव

सौरव गांगुली (भारत) - २२८ डाव

सचिन तेंडुलकर (भारत) - २३५ डाव

ब्रायन लारा (वेस्ट इंडीज) - २३९ डाव

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.