मुंबई - भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा संपवून माघारी परतला आहे. रोहित सध्या पत्नी रितिका आणि लहान मुलगी समायरा सोबत मौज-मजा करत आहे. रोहितने मुलगी रितिकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओमध्ये रोहित समायरा सोबत मस्ती करताना दिसत आहे. रोहित बरोबर पत्नी रितिकाने देखील समायराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समायरा झोपेत आहे. परंतु, ती झोपेत हसत आहे. समायराचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाख ५० हजारपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रोहित गेल्यावर्षी मुलगी समायराच्या जन्माच्यावेळी ऑस्ट्रेलिया दौरा सोडून भारतात परतला होता. डिसेंबर महिन्यात समायराचा जन्म झाला होता. समायराचा जन्म झाल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परतला होता. यानंतर, न्यूझीलंड दौऱ्यामुळे रोहितला भारतात परतणे शक्य झाले नाही. भारतात माघारी परतल्यानंतर रोहित आता परिवारासोबत वेळ घालवत आहे.