हैदराबाद - भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्याची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. बंगळुरूच्या तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात हिरो ठरला सलामीवीर रोहित शर्मा. त्याने ११९ धावांची खेळी केली. रोहितच्या खेळीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याचे कौतूक केले.
शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक अपलोड केला आहे. त्यात त्याने रोहितचे कौतूक केले आहे. तो म्हणतो, 'जेव्हा रोहित संपूर्ण लयीत फलंदाजी करत असतो. तेव्हा त्याच्यासाठी कोणताही चेंडू सोपा किंवा अवघड नसतो. तो सगळ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतो. तो लयीत असला की, त्याच्याकडे चेंडूला टोलवण्यासाठी भरपूर वेळ असतो. त्याने सामन्यात नैसर्गिक खेळ केला.'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितची फलंदाजी पाहिली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतले. मिचेल स्टार्क असो की पॅट कमिन्स असो, त्याने कोणालाही दयामाया दाखवली नाही. त्याने खेळलेला कट शॉट पाहून तर मला सचिन तेंडुलकरची आठवण आली, असेही शोएब म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दरम्यान, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील ८ वे शतक झळकावले. त्याने तिसऱ्या सामन्यात ११९ धावांची खेळी केली. यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. या खेळीदरम्यान, रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ९ हजार धावांचा टप्पाही पार केला.
हेही वाचा - Ind vs Aus : बंगळुरू लढतीतील विजयाचे 'हिरो', 'यांनी' केली कागांरूची शिकार
हेही वाचा - रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण