ETV Bharat / sports

रोड सेफ्टी विश्व सिरीज : भारताचा सलग दुसरा विजय, इरफानची 'पठाणी' खेळी - रोड सेफ्टी विश्व सिरीज

भारतीय संघाने रोड सेफ्टी विश्व सिरीजमध्ये लागोपाठ दुसरा विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला.

Road Safety World Series T20 2020 : India Legends beats Sri Lankan Legends by 5 wickets
रोड सेफ्टी विश्व सिरीज : भारताचा सलग दुसरा विजय, इरफानची 'पठाणी' खेळी
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:39 PM IST

मुंबई - भारतीय संघाने रोड सेफ्टी विश्व सिरीजमध्ये लागोपाठ दुसरा विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. श्रीलंका लिजेंड्स संघाने २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या होत्या. इंडिया लिजेंड्सने हे लक्ष्य १८.४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. इरफान पठाणने नाबाद ५७ धावांची खेळी केली.

इंडिया लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्रीलंका लिजेंड्स संघाने २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या. तिलकरत्ने दिलशान आणि रमेश कालूवितरणा या सलामीवीर जोडीने ७.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. दिलशान बाद झाल्यानंतर श्रीलंका लिजेंड्सची मधली फळी अपयशी ठरली. अखेर चमारा कप्पुगेदरा (२३), सेनानाईके (१९) आणि रंगना हेरथ (१२) यांच्या खेळीने श्रीलंका लिजेंड्सना १३८ धावांची मजल मारता आली. मुनाफ पटेलने इंडिया लिजेंड्स संघाकडून सर्वाधिक ४ गडी बाद केले. जहीर खान, इरफान पठाण, मनप्रीत गोनी, संजय बांगर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

श्रीलंका लिजेंड्सने दिलेले १३९ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या इंडिया लिजेंड्स संघाची सुरुवात खराब झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला. त्याला चमिंडा वासने बाद केले. सचिन पाठोपाठ सेहवाग धावबाद झाला. त्यानंतर युवराज वासचा बळी ठरला. यामुळे इंडिया लिजेंड्स संघाची अवस्था ४.२ षटकात ३ बाद १९ अशी झाली होती. तेव्हा मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. बांगरचा (१८) अडथळा हेरथने काढला.

कैफ आणि इरफान पठाण या जोडीने फटकेबाजी करत संघाला विजयासमीत नेले. कैफ ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर इरफान आणि मनप्रीत गोनी संघाला विजय मिळवून दिला. इरफान पठाणने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. चमिंडा वासने २ गडी बाद केले.

दरम्यान, रोड सेफ्टीबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ही मालिका खेळवण्यात येत आहे. भारतामध्ये रस्त्यावरील अपघातामध्ये चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे लोकांना याबाबत जागरूक करण्यासाठी ही मालिका खेळवली जात आहे. यामध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे देश सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - 'वाडा' अहवाल चुकीचा, परेराला द्यावी लागली ५ लाख डॉलरची नुकसान भरपाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.