ETV Bharat / sports

लॉकडाऊन : पंत सद्या काय करतो, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंत सध्या आपला फिटनेस राखण्याकडे लक्ष देत आहे. तो क्वारंटाईनच्या काळात घरामध्ये दररोज व्यायाम करत आहे.

author img

By

Published : Mar 28, 2020, 10:43 AM IST

Rishabh Pant's Workout Video Will Inspire You To Stay Fit During Lockdown. Watch
लॉकडाऊन : पंत सद्या काय करतो, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील व्यवहारासह क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आपल्या बहिणीसह जादूची कला दाखवतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला होता. आता ऋषभ पंतचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पंत सध्या आपला फिटनेस राखण्याकडे लक्ष देत आहे. तो क्वारंटाईनच्या काळात घरामध्ये दररोज व्यायाम करत आहे.

दरम्यान, २०१९ विश्वकरंडकात उपांत्य फेरीत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली. मात्र या संधीचे पंतला सोने करता आलेले नाही. तो यष्ट्यांमागे ढिसाळ कामगिरी तसेच बेजबाबदार फटकेबाजीमुळे नेहमी टिकेचा धनी ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्य आता अंधारात आहे.

कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर भडकला भज्जी, म्हणाला...

हेही वाचा - 'कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे, याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.