चेन्नई - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्याने मोठी हानी झाली. जिल्ह्यातील जोशी मठ येथील बद्रीनाथ मार्गावर ही घटना घडली. या घटनेतील बचावकार्यासाठी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने आपल्या एका सामन्याचे मानधन देऊ केले आहे. पंत भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा सदस्य आहे.
हेही वाचा - तब्बल १३ वर्षे 'अनसोल्ड' राहिलेल्या मुशफिकुरची यंदाच्या आयपीएलमधून माघार
रविवारी सकाळी या शोकांतिकेच्या घटनेनंतर सुमारे दीडशे लोक बेपत्ता आणि ठार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १०हून अधिक लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पंतने लोकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीव गमावलेल्यांच्या कुटूंबासाठी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, आपत्तीत गंभीर जखमी झालेल्यांसाठी ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. लोकांच्या सुरक्षेचा विचार करता स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच नदीमार्गातील सर्व गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमनदी फुटल्याने डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्यासह दगड मातीचा लोंढा खाली आला. यात १५०जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021
नक्की काय झाले?
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी एक महाकाय हिमकडा कोसळला. कोसळलेल्या हिमकड्यामुळे ऋषीगंगा आणि धौलीगंगा नदीला प्रलयंकारी महापूर आला. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे नदीतील पाणीपातळी वाढून पाण्याच्या प्रवाहाची गतीही कैकपटीने वाढली. त्यामुळे नदी पात्राबाहेरून ओसंडून वाहू लागली. अचानकच निर्माण झालेल्या या अभूतपूर्व स्थितीमुळे नदीकिनाऱ्याजवळील परिसरात मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ माध्यमांमधून लगेचच समोर आले. त्यामुळे या महाप्रलयाच्या भीषणतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो.