मुंबई - कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतीय खेळाडू यामुळे आपापल्या घरी कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. पण, खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडले गेले आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट केले. यात त्यांनी आयपीएल संदर्भात संघाच्या गेमप्लानबद्दल चर्चा केली तसेच मजेशीर गप्पाही मारल्या. त्यांच्या या लाईव्ह चॅटचा चाहत्यांनाही आनंद लुटला.
लाईव्ह चॅटदरम्यान, बुमराहने रोहितला सांगितले की, ऋषभ पंत तुला सर्वात लांब षटकार ठोकण्यासाठी आव्हान देऊ इच्छित आहे. यावर रोहित म्हणाला, त्याला माझ्यासोबत हे करायचयं.. संघात येऊन एक वर्ष झाले नाही आणि तो मला षटकारसाठी आव्हान देत आहे. पंगा क्यू ले रहा है चूपचाप बैठ ना.' रोहितचे हे उत्तर ऐकून बुमराहला हसू अनावर झाले.
-
Pant ko Ro se panga pada mehnga😂@ImRo45@RishabhPant17 #StayHomeStaySafe pic.twitter.com/btGxK6JTpF
— KUⓂ🅰R #45 (@Kumar45_) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pant ko Ro se panga pada mehnga😂@ImRo45@RishabhPant17 #StayHomeStaySafe pic.twitter.com/btGxK6JTpF
— KUⓂ🅰R #45 (@Kumar45_) April 2, 2020Pant ko Ro se panga pada mehnga😂@ImRo45@RishabhPant17 #StayHomeStaySafe pic.twitter.com/btGxK6JTpF
— KUⓂ🅰R #45 (@Kumar45_) April 2, 2020
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. यंदाची आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण, कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण सद्य परिस्थिती पाहता ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू होईल की नाही, यावर सशांकता आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, रोहित न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेदरम्यान दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात रोहितला दुखापत झाल्याने त्याला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. महत्वाचे म्हणजे, दोन्ही मालिकेत भारताला न्यूझीलंडने 'क्लीन स्वीप' केले.
WC २०११ : धोनीचा षटकार अन् भारताने जिंकला विश्वकरंडक, सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू