दुबई - आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने या क्रमवारीत प्रथमच टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. क्रमवारीत पंत अन्य दोघांसह संयुक्तीक ७व्या क्रमांकावर आहे.
कसोटी क्रमवारीत रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर आहे. तर हेन्नरी निकोलस देखील याच क्रमांकावर आहे. तिघांचे प्रत्येकी ७४७ गुण आहेत. या तिघांच्या पुढे पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्याचे ७६० इतके गुण आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीचे बक्षिस मिळाल्याचे क्रमवारीतून दिसून आले.
केन विल्यमसन पहिल्या स्थानावर...
कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन पहिल्या स्थानावर आहे. त्याचे ९१९ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या, मार्नस लाबुशेन हा तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जो रूट चौथ्या तर विराट कोहली या यादीत ५व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत आर अश्विन दुसऱ्या तर अष्टपैलूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : विराटच्या RCB संघाला जबर धक्का; 'या' खेळाडूची स्पर्धेतून माघार
हेही वाचा -'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?