मेलबर्न - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंशी 2020-21 या वर्षासाठी करार केला. यात मार्नस लाबुशेनसह सहा नवीन खेळाडूंशी ऑस्ट्रेलिया बोर्डाने करार केला आहे. तर डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजासह 5 जणांना करारमुक्त केले आहे. उस्मानची आता राष्ट्रीय संघात निवड होणे कठीण असल्याचे मत दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने दिले आहे.
पाँटिंग म्हणाला, ''ख्वाजाच्या कामगिरीमध्ये सातत्य नसणे ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी समस्या आहे. मला उस्मान आवडतो. जेव्हा त्याने पदार्पण केले होते तेव्हापासून मी 10 वर्षे त्याच्याजवळ होतो.''
पाँटिंग पुढे म्हणाला, "मला नेहमीच असे वाटते की तो एक चांगला खेळाडू आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही कधीच त्याची सर्वोत्तम कामगिरी पाहिली नव्हती. त्याची झलक आम्ही पाहिली आहे, पण ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या कामगिरीत सातत्य असल्याचे मला वाटत नाही.''
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करार केलेले पुरुष खेळाडू -
अॅश्टन एगर, जो बर्न्स, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिंन्स, अॅरोन फिंच, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नाथन लॉयन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेन, जेम्स पॅटीन्सन, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क , मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.