मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक वापरल्या गेलेल्या बॅटचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ''या बॅटमुळे मी पाच आंतरराष्ट्रीय शतके केली. त्यापैकी चार दक्षिण आफ्रिकेविरुध्द केली आहेत. एससीजीतील माझ्या शंभराव्या कसोटीत मी 120 आणि 143 धावांची खेळी केली होती'', असे पाँटिंगने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पाँटिंगने पुढे लिहिले, "याशिवाय वँडर्स येथे खेळल्या गेलेल्या 444 विरुद्ध 438 धावांच्या एकदिवसीय सामन्यात मी 164 धावा केल्या होत्या. या बॅटचा मी जेवढा वापर करू शकत होतो तेवढा मी केला. आता ही बॅट खराब झाली आहे.''
-
Five international hundreds with this baby, four of them against South Africa. The 120 and 143* were made in my 100th Test at the SCG.
— Ricky Ponting AO (@RickyPonting) May 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
And the 164 was made in the famous 434 v 438 ODI at the Wanderers. Used it for as long as I could and as you can see it's pretty worn out. pic.twitter.com/Mn4PX4TTqj
">Five international hundreds with this baby, four of them against South Africa. The 120 and 143* were made in my 100th Test at the SCG.
— Ricky Ponting AO (@RickyPonting) May 19, 2020
And the 164 was made in the famous 434 v 438 ODI at the Wanderers. Used it for as long as I could and as you can see it's pretty worn out. pic.twitter.com/Mn4PX4TTqjFive international hundreds with this baby, four of them against South Africa. The 120 and 143* were made in my 100th Test at the SCG.
— Ricky Ponting AO (@RickyPonting) May 19, 2020
And the 164 was made in the famous 434 v 438 ODI at the Wanderers. Used it for as long as I could and as you can see it's pretty worn out. pic.twitter.com/Mn4PX4TTqj
पाँटिंगची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आपल्या देशासाठी 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या तीन स्वरूपात त्याने एकूण 27,483 धावा केल्या. त्याच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 साली विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती.
सध्या पाँटिंग आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.