ETV Bharat / sports

VIDEO : जब से हुई है शादी, आफत गले पडी है ! शिखर धुतोय कपडे अन् टॉयलेट... - शिखर धवन करतोय कमोड साफ

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याची बायको आयेशा ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा कपडे आणि घरातले कमोड साफ करताना दिसत आहे.

really hits hard shikhar dhawan spending quarantine time washing clothes cleaning toilet
Video : जब से हुई है शादी, आफत गले पडी है ! पत्नी आयेशा शिखरला कपडे अन् टॉयलेट साफ करायला तेव्हा...
author img

By

Published : Mar 25, 2020, 7:54 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा विश्व ठप्प झालं आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबीयासोबत घरी आहेत. पण, नेहमी मैदानावर लाखो चाहत्यांच्या गराड्यात असणाऱ्या खेळाडूंवर सध्या घरातली सर्व कामे करायची वेळ आलेली आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याची बायको आयेशा ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा कपडे आणि घरातले कमोड साफ करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'जब से हुई है शादी, आफत गले पडी है, गाणे वाजत आहे.

दरम्यान, याआधीही शिखरने सोशल मीडियावर आपले गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलांसोबत डोळ्यांवर पट्टी बांधून पिलो-फाईटचा व्हिडिओ शेअर केला होता.

कोरोनाच्या वाढलेल्या धोक्यामुळे २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - ऐतिहासिक निर्णय...टोकियो ऑलिम्पिक आता पुढच्या वर्षी

हेही वाचा - जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.