किंग्स्टन - भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार मिळाला. सध्या जडेजा विंडीज दौऱ्यावर व्यग्र असल्याने त्याला या पुरस्कार सोहळ्याला हजर राहता आले नाही. त्यामुळे त्याने एका व्हिडीओद्वारे भारत सरकारचे आभार मानले आहेत.
जडेजा म्हणाला, 'सर्वात प्रथम अर्जुन पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे मी भारत सरकारचे आभार मानतो. पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. त्यांनी शानदार प्रदर्शन केले आहे.' बीसीसीआयने जडेजाचा हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
-
All-rounder @imjadeja's special message after being conferred with the Arjuna Award 🙏🙏 #TeamIndia pic.twitter.com/6k6jmdDKMv
— BCCI (@BCCI) August 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All-rounder @imjadeja's special message after being conferred with the Arjuna Award 🙏🙏 #TeamIndia pic.twitter.com/6k6jmdDKMv
— BCCI (@BCCI) August 29, 2019All-rounder @imjadeja's special message after being conferred with the Arjuna Award 🙏🙏 #TeamIndia pic.twitter.com/6k6jmdDKMv
— BCCI (@BCCI) August 29, 2019
जडेजा पुढे म्हणाला, 'जेव्हा जेव्हा मी देशासाठी खेळेन तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. नेहमी विजय मिळवण्यासाठी आणि देशाचा गौरव करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.' आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत जडेजा चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
याअगोदर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे.