मुंबई - भारतीय संघाच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने सरावाला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जडेजाला दुखापत झाली होती. यातून तो आता सावरला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीदरम्यान, जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेलाही मुकला.
जडेजावर बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर जडेजाने सरावाला सुरूवात केली आहे. दरम्यान, जडेजा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे.
-
Back on the field 🏃🏻#firstday #postsurgery pic.twitter.com/SrCyLx7TQx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Back on the field 🏃🏻#firstday #postsurgery pic.twitter.com/SrCyLx7TQx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 2, 2021Back on the field 🏃🏻#firstday #postsurgery pic.twitter.com/SrCyLx7TQx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 2, 2021
३२ वर्षीय जडेजाने ५१ कसोटीत १ हजार ९५४ धावांसोबत २२० विकेट घेतल्या आहेत. तर १६८ एकदिवसीय सामन्यात २ हजार ४११ धावांसह त्याच्या नावे १८८ विकेट आहेत. ५० टी-२० सामन्यात जडेजाने २१७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावे ३९ विकेटची नोंद आहे.
हेही वाचा - महिला एकदिवसीय क्रमवारी : स्मृतीची सहाव्या स्थानावर घसरण
हेही वाचा - बुमराह बोहल्यावर चढणार, बीसीसीआयकडे लग्नासाठी मागितली सुट्टी