चेन्नई - न्यूझीलंड दौर्यावर फ्लॉप ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने घरच्या मैदानावर शतक झळकावत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या (टीएनसीए) डिव्हिजन लीगमध्ये अश्विनने शतक झळकावले. एमआरसी-एकडून खेळताना त्याने १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०२ धावांची खेळी केली.
हेही वाचा - अवघ्या तीन दिवसांत शफालीने गमावले पहिले स्थान
या शतकाच्या खेळीदरम्यान अश्विनने आर.श्रीनिवासनसोबत (८७) संघासाठी महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली. अश्विन न्यूझीलंड दौर्यावरून परतल्यानंतर प्रथमच येथे दाखल झाला. न्यूझीलंडमध्ये त्याला पहिल्या कसोटीत (वेलिंग्टन) खेळण्याची संधी मिळाली होती.
वेलिंग्टन कसोटीत अश्विनची कामगिरी चांगली झाली नाही. या सामन्यात त्याला केवळ दोन बळी घेता आले. दुसऱया कसोटीत मात्र, त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले. भारताने ही कसोटी मालिका ०-२ ने गमावली.
अश्विनने आतापर्यंत ७१ कसोटी सामन्यात २३८९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावार कसोटीत ४ शतके आणि ११ अर्धशतके जमा आहेत.