दुबई - रोहित शर्माची दुखापत गंभीर होण्याचा धोका असून त्याने सराव करण्याची घाई करू नये, असा सल्ला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हिटमॅनला दिला आहे. शास्त्री यांनी रोहितचा रिपोर्ट पाहिला असल्याचे सांगितले.
यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएएल स्पर्धेदरम्यान, रोहितच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. यामुळे त्याचा समावेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात करण्यात आलेला नाही. यादरम्यान, रोहित दुखापतग्रस्त असताना फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळाला.
याविषयावरून अनेक वाद निर्माण झाले. यावर शास्त्रींनी सांगितले, की रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात घ्यायचे की नाही, हे निवड समितीने त्याचा रिपोर्ट पाहून ठरवले आहे. सध्या रोहित बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निगराणीत आहेत. त्याच्या दुखापतीसंबंधीचा रिपोर्ट त्यांनी बीसीसीआयकडे पाठवला आहे.
निवड समितीच्या निर्णयात माझा कोणताही हस्तक्षेप नाही. मी या निवड प्रक्रियेचा भाग नसल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले. पण रोहितचा रिपोर्ट मी पाहिला आहे. यात रोहित शर्माची दुखापत, गंभीर होण्याचा धोका असून त्याने सराव करण्याची घाई करू नये, असा सल्ला शास्त्री यांनी दिला.
रोहितने याआधी त्याच्या करियरच्या सुरूवातील हीच चूक केली होती. ती चूक त्याने पुन्हा करू नये, असे शास्त्रींनी सांगितले.
हेही वाचा - धोनीचे 'दोन' शब्द सोशल मीडियावर ट्रेंड..! पाहा व्हिडिओ
हेही वाचा -IPL २०२० : पिवळ्या जर्सीत हा तुझा अखेरचा सामना आहे का? धोनीने दिले 'हे' उत्तर