नवी दिल्ली - भारतीय संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. बांगलादेश विरोधात २२ नोव्हेंबर पासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणाऱ्या या सामन्याची उत्सुकता खेळाडूंसह चाहत्यांना लागली आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात होम हवन करताना दिसून आले.
कोलकाताच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने सर्व तयारी केली आहे. तसेच भारतीय संघातील आणि बांगलादेशचे खेळाडू गुलाबी चेंडूवर सराव करताना दिसून येत आहेत. यासाठी विशेष रात्रीचे सराव शिबीरही भरवण्यात आले आहेत. विराट कोहली आणि अन्य खेळाडू या सामन्यासाठी कसून सराव करत असताना दिसत आहे.
-
Ravi Shastri offered prayers at the Mahakaleshwar temple Ujjain #INDvBAN @RaviShastriOfc pic.twitter.com/SS3K5QR3SS
— Manoj Khandekar (@manojkhandekar) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ravi Shastri offered prayers at the Mahakaleshwar temple Ujjain #INDvBAN @RaviShastriOfc pic.twitter.com/SS3K5QR3SS
— Manoj Khandekar (@manojkhandekar) November 17, 2019Ravi Shastri offered prayers at the Mahakaleshwar temple Ujjain #INDvBAN @RaviShastriOfc pic.twitter.com/SS3K5QR3SS
— Manoj Khandekar (@manojkhandekar) November 17, 2019
दुसरीकडे रवी शास्त्री हवन करताना दिसले. महत्वाचे म्हणजे, शास्त्रींसोबत भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण हेही दिसत आहेत. या हवनचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हे हवन भारतीय संघाच्या यशासाठी करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - VIDEO : 'दो रुपये की पेप्सी, मुश्फीकुर रहिम सेक्सी'
हेही वाचा - बेनला नडला पेन, म्हणाला, 'आपलं पुस्तक विकलं जाण्यासाठी तो हे सगळं करतोय'