ETV Bharat / sports

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोना लस; दिली 'ही' प्रतिक्रिया

आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली. त्यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Ravi Shastri Gets First Dose Of COVID-19 Vaccine
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोना लस; दिली 'ही' प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 2, 2021, 11:16 AM IST

मुंबई - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. कालपासून (ता १ सोमवार) तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. यात जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरिल व्याधीग्रस्त अशा लोकांना लस दिली जात आहे. आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लस घेतली. त्यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रवी शास्त्री यांनी लस घेतानाचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहल आहे की, 'आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या विषाणूशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्याने जगभरात देशाची मान आणखी उंचावली. या सर्वांचे मी आभार मानतो.'

  • Got the first dose of COVID-19 vaccine. Thank you to the amazing medical professionals & scientists for empowering India 🇮🇳 against the pandemic.

    Extremely impressed with the professionalism shown by Kantaben & her team at Apollo, Ahmedabad in dealing with COVID-19 vaccination pic.twitter.com/EI29kMdoDF

    — Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान तिसऱ्या टप्प्यात प्राथमिक माहितीनुसार, 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. जवळपास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागणार आहेत.

काल (सोमवार ता. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील लस घेतली. लस घेतल्यानंतर या सर्वांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - विराट मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेरही किंग, आयसीसीने घेतली दखल

हेही वाचा - इंग्लडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वरुण चक्रवर्ती पडणार बाहेर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.