ETV Bharat / sports

हाफिज आणि मलिक यांनी 'इज्जती'ने क्रिकेट सोडावं - पाक माजी कर्णधार

एका वृत्तवाहिनीशी रमीज राजा यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून बातचित केली. यात ते म्हणाले, 'मी नेहमी खेळाडूंच्या व्यक्तिगत विषयावर भाष्य करणे टाळतो. हाफिज आणि मलिक यांनी पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली आहे. यात दुमत नाही. पण मला वाटत की, त्यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी. ही त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे.'

author img

By

Published : Apr 7, 2020, 12:51 PM IST

Ramiz Raja syes Hafeez, Malik should retire gracefully
हाफिज आणि मलिक यांनी 'इज्जती'ने क्रिकेट सोडावं - पाक माजी कर्णधार

इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिध्द समालोचक रमीज राजा यांनी पाक संघाचे अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा सल्ला दिला आहे. हाफिज आणि मलिक यांनी स्वत:हून आता सन्मानाने क्रिकेट सोडलं पहिजे, असे रमीज यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी रमीज राजा यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून बातचित केली. यात ते म्हणाले, 'मी नेहमी खेळाडूंच्या व्यक्तिगत विषयावर भाष्य करणे टाळतो. हाफिज आणि मलिक यांनी पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली आहे. यात दुमत नाही. पण मला वाटत की, त्यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी. ही त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे. त्यांनी जर निवृत्ती घेतली तर याचा फायदा पाकिस्तान संघालाच होईल. पाकिस्तानकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना घेऊन संघाला पुढे जाता येईल.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ३९ वर्षीय हाफिजने ऑस्ट्रेलियात होणारी टी- विश्वकरंडक स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे ३८ वर्षीय मलिकने याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण, त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

हेही वाचा - टी-२० विश्वकरंडक नियोजित वेळेत होणार, यजमान ऑस्ट्रेलियाचा विश्वास

हेही वाचा - स्मिथ, वॉर्नर नसल्याने जिंकलात, पाक प्रशिक्षकांनी टीम इंडियाला डिवचले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.