मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघाला आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही. ही स्पर्धा संपल्यानंतर संघाचे प्रशिक्षक अमित पगनिस यांनी राजीनामा दिला होता. आता पगनिस यांच्या जागेवर फिरकीपटू रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज रमेश पोवार यांची मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. पोवार यांनी याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली आहे.
प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर पोवार म्हणाले की, 'एमसीए आणि सीआयसी यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी संघात सकारात्मक वातावरण तयार करणे आणि संघाला पॉझिटिव्ह ब्रँड करण्यास उत्सुक आहे. याच दोन गुणांसाठी मुंबईचा संघ ओळखला जातो.'
दरम्यान, रमेश पोवार यांच्या प्रशिक्षणात मुंबईचा संघ विजय हजारे करंडक खेळणार आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एलिट ग्रुपमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पाँडिचेरी या संघाचे मुंबईसमोर आव्हान आहे.
ही वाचा - चेन्नईतील पराभव : भारतीय संघाचे टेन्शन वाढले; WTCचा अंतिम सामना खेळण्याची करावं लागेल 'हे' काम
हेही वाचा - IND vs ENG : अजिंक्यला संघातून वगळणार का? प्रश्नावर विराट संतापला, म्हणाला...