डर्बन - यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. शुक्रवारी किंग्समीड मैदानावर इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-२० सामन्यात डी कॉकने ही कामगिरी केली.
हेही वाचा -भावनाचे ऑलिम्पिकचे तिकीट पक्के, २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत नोंदवला नॅशनल रेकॉर्ड
डी कॉकने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २२ चेंडूत ६५ धावा टोलवल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. यापूर्वी, अब्राहम डिव्हिलीयर्स आणि डी कॉक यांनी २०१६ मध्ये विविध सामन्यांत २१ चेंडूत ५० धावांचा ठोकल्यो होत्या.
डी कॉकने वादळी खेळी केली असली तरी, दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही. आफ्रिकेला दोन धावांनी मात खावी लागली. या विजयानंतर इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते.