ETV Bharat / sports

सॉलिडॉरिटी कप : यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची माघार

author img

By

Published : Jul 18, 2020, 2:58 PM IST

क्विंटन डी कॉकच्या जागी फलंदाजीसाठी रायन रिकल्टनचा संघात समावेश करण्यात आला असून कर्णधारपदाची जबाबदारी टेम्बा बावुमाकडे देण्यात आली आहे.

Quinton de kock pulls out of 3tc solidarity cup
सॉलिडॉरिटी कप : यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची माघार

सेंचुरियन - दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 3 टीसी सॉलिडॉरिटी कपमधून माघार घेतली आहे. सेंचुरियनमधील सुपर स्पोर्ट पार्क येथे आज (शनिवारी) हा सामना होणार आहे. काइट्स संघाचे नेतृत्व डी कॉककडे होते.

त्याच्या जागी फलंदाजीसाठी रायन रिकल्टनचा संघात समावेश करण्यात आला असून कर्णधारपदाची जबाबदारी टेम्बा बावुमाकडे देण्यात आली आहे. वैयक्तिक कारणामुळे डी कॉकने आपले नाव मागे घेतले असल्याचे म्हटले जात आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, सिसंदा मगाला आणि अष्टपैलू ख्रिस मॉरिसदेखील या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

संघ -

किंगफिशर - रिझा हेंड्रिक्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, जेन्नेमन मालन, फाफ डु प्लेसिस, थान्डो एनटिनी, गेराल्ड कोटजी, ग्लॅटन स्टर्मन, तबरेज शमसी. प्रशिक्षक - मिग्नॉन डू प्रीझ.

काइट्स - टेम्बा बावुमा (कर्णधार), जॉन-जोन स्मट्स, डेव्हिड मिलर, ड्वाइन प्रेटोरियस, लुथो सिपमला, ब्युरेन हेंड्रिक्स, एनिच नॉर्टजे, रायन रिक्लटॉन. प्रशिक्षक - वान्डीले ग्वावू.

इगल्स - एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), एडन मार्करम, रेसी व्हॅन डर ड्यूसेन, काइल व्हेरिन, अ‍ॅन्डिले फेहलुक्वायो, बार्जर्न फोर्टुईन, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी. प्रशिक्षक - जोफ्रे टोयाना.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.