ETV Bharat / sports

चेतेश्वर पुजाराची कमाल, कसोटीत ६ हजाराचा टप्पा गाठत पटकावले दिग्गजांच्या यादीत स्थान - Cheteshwar Pujara news

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला. पुजारा अशी कामगिरी करणारा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे.

pujara-completes-his-6000-runs-in-test-cricket
चेतेश्वर पुजाराची कमाल, कसोटीत ६ हजाराचा टप्पा गाठत पटकावले दिग्गजांच्या यादीत स्थान
author img

By

Published : Jan 11, 2021, 10:40 AM IST

सिडनी - भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला. पुजारा अशी कामगिरी करणारा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे. त्याने सिडनीमध्ये नॅथन लिओनच्या चेंडूवर धाव घेत ६ हजाराचा टप्पा गाठला. याशिवाय पुजारा सर्वाधिक वेगाने ६ हजार धावा करणारा भारताचा ६ वा फलंदाज ठरला आहे.

कसोटी स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या पुजाराने ८० कसोटीतील १३४ डावात ६ हजार धावा पूर्ण केल्या. यात १८ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांची सरासरी ४८ इतकी आहे. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०६ आहे.

  • Cheteshwar Pujara has become the 11th Indian batsman to reach 6000 runs in Test cricket!

    What a fine player he has been 🔥

    He is also closing in on a fifty in the #AUSvIND Test. pic.twitter.com/MMApa5sIs9

    — ICC (@ICC) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुजाराआधी भारताकडून ६ हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर (१५९२१), राहुल द्रविड (१३२६५), सुनिल गावसकर (१०१२२), व्हीव्हीएस लक्ष्मण (८७८१), विरेंद्र सेहवाग (८५०३), विराट कोहली (७३१३), सौरव गांगुली (७२१२), दिलीप वेंगसरकर (६८६८), मोहम्मद अजहरुद्दीन (६२१५) आणि गुंडप्पा विश्वनाथ (६०८०) यांनी पार केला आहे. ३२ वर्षीय पुजारा भारताकडून सर्वात वेगाने ६ हजार धावांचा टप्पा करणारा ६ वा खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ६ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू -

  • सुनिल गावसकर (११७ डावात)
  • विराट कोहली (११९ डावात)
  • सचिन तेंडुलकर (१२० डावात)
  • विरेंद्र सेहवाग (१२३ डावात)
  • राहुल द्रविड (१२५ डावात)
  • चेतेश्वर पुजारा (१३४ डावात)*
  • मोहम्मद अजहरुद्दीन (१४३ डावात)

हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

हेही वाचा - England vs Sri Lanka: श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून मोइन अली बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.