ETV Bharat / sports

पाकिस्तान सुपर लीगमध्ये आणखी ३ खेळाडूंना कोरोनाची लागण - पाकिस्तान सुपर लीग २०२१ न्यूज

पाकिस्तान सुपर लीगमधील आणखी तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

psl-2021-postponed-after-three-more-players-test-positive-for-covid-19
पाकिस्तान सुपर लीगमध्ये आणखी तीन खेळाडू कोरोनाबाधीत
author img

By

Published : Mar 4, 2021, 4:44 PM IST

कराची - पाकिस्तान सुपर लीगमधील आणखी तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची पृष्टी केली.

पीसीबीने सांगितलं की, 'पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या दोन संघातील आणखी तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. ते दहा दिवसांसाठी विलगीकरणात राहतील. दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तान सुपर लीगमधील कोरोनाबाधितांची संख्या सहा इतकी झाली आहे.

बुधवारी खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमधून दिसून आले. हे तीनही खेलाडू पीएसएलमध्ये झालेल्या दोन सामन्यात खेळले नव्हते. पण त्यांच्यात लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती, असे देखील पीसीबीने सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पीएसएलमध्ये सहभागी संघाच्या मालकांशी पीसीबी ऑनलाईन बैठक करणार आहे. यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

हेही वाचा - IND Vs ENG ४th Test १st Day : उपहारापर्यंत इंग्लंड ३ बाद ७४ धावा

हेही वाचा - WI vs SL: ६ चेंडूत ६ षटकार; पोलार्डची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.