ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉची झंझावात, तोडला मयांकचा विक्रम - MUM vs KAR Vijay Hazare Trophy Semifinal

मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात १२२ चेंडूत १६५ धावांची वादळी खेळी केली.

prithvi-shaw-smashed-another-hundred-in-vijay-hazare-trophy
Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉची झंझावात, तोडला मयांकचा विक्रम
author img

By

Published : Mar 11, 2021, 3:21 PM IST

दिल्ली - मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात १२२ चेंडूत १६५ धावांची वादळी खेळी केली. पृथ्वीचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे शतक ठरले. यासोबतच शॉने एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवालचा विक्रमही मोडीत काढला.

श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पृथ्वी मुंबईचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या कर्नाटकविरुद्ध मुंबईला पहिल्यांदा फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. तेव्हा पृथ्वीने आक्रमक खेळ करत कर्नाटकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

मयांकचा मोडला विक्रम...

पृथ्वी शॉ विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मयांकचा विक्रम मोडित काढला. मयांकने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या २०१७-१८ या हंगामात ७२३ धावा केल्या होत्या. मयांक अग्रवालचा विक्रम तोडताना पृथ्वी शॉने चार शतकासह ७५४ धावा केल्या आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमध्ये पुद्दुचेरीविरोधातील केलेल्या २२७ धावांचाही समावेश आहे.

कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने १२२ चेंडूंमध्ये १६५ धावा केल्या. या खेळीत त्याने १७ चौकार आणि सात षटकार ठोकले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वी शॉ भारतीय संघात होता. पण खराब फलंदाजीमुळे पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याला वगळण्यात आले. इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यातही पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही. यादरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

विजय हजारे करंडक २०२१ मध्ये पृथ्वी शॉ याने झळकावलेले शतक

  • विरुद्ध दिल्ली - ८९ चेंडूत नाबाद १०५ धावा
  • विरुद्ध पुडुचेरी - १५२ चेंडूत नाबाद २२७ धावा
  • विरुद्ध सौराष्ट्र - १२३ चेंडूत नाबाद १८५ धावा
  • विरुद्ध कर्नाटक - १२२ चेंडूत १६५ धावा

हेही वाचा - भारतात होणाऱ्या टी-२० विश्व करंडकाचा 'हा' संघ असेल मुख्य दावेदार; इंग्लंडच्या खेळाडूची भविष्यवाणी

हेही वाचा - Video : क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे फलंदाजाला ठरवलं बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात वादग्रस्त निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.