मुंबई - भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे तो लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावरील भारत 'अ' संघात सामील होईल. मुंबई-कर्नाटक रणजी सामन्यादरम्यान, पृथ्वी शॉच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला नव्हता.
हेही वाचा - साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब
'शॉ गुरुवार किंवा शुक्रवारी न्यूझीलंडला रवाना होईल. तो पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आला आहे', असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. पृथ्वीने बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव केला. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने आता स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी त्याला 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर शॉनेही सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
-
My favourite sound. The sound when the ball hits the middle of my bat. Superb net sessions going on. pic.twitter.com/Iw8bUJXE4N
— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My favourite sound. The sound when the ball hits the middle of my bat. Superb net sessions going on. pic.twitter.com/Iw8bUJXE4N
— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 14, 2020My favourite sound. The sound when the ball hits the middle of my bat. Superb net sessions going on. pic.twitter.com/Iw8bUJXE4N
— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 14, 2020
या दौऱ्यात भारतीय 'अ' संघ न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध ३ एकदिवसीय आणि २ चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका २२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर ३० जानेवारीपासून चार दिवसीय कसोटी सामन्यांची मालिका सुरु होईल.