ETV Bharat / sports

भारतीय संघाबाहेर होताच पृथ्वी शॉ याने झळकावलं द्विशतक - विजय हजारे स्पर्धेत द्विशतक न्यूज

विजय हजारे करंडक स्पर्धेत पृथ्वी शॉ यानं पुदुच्चेरीविरोधात द्विशतक झळकावले.

prithvi shaw hits double century in vijay hazare trophy 2021
भारतीय संघाबाहेर होताच पृथ्वी शॉ याने झळकावलं द्विशतक
author img

By

Published : Feb 25, 2021, 3:00 PM IST

जयपूर - भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर पृथ्वी शॉ यानं नाबाद द्विशतक ठोकत आपली प्रतिभा दाखवून दिली. विजय हजारे करंडक स्पर्धेत पृथ्वी शॉ यानं पुदुच्चेरीविरोधात द्विशतक झळकावले.

न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वी शॉची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. मात्र तिथे त्याला आपली छाप सोडता आली नाही. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या माध्यमातून शॉ याला आणखी एक संधी मिळाली. तिथेही तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतून त्याला डच्चू देण्यात आला होता. संघाबाहेर गेल्यानंतर पृथ्वी शॉ यानं आक्रमक फलंदाजी करताना, नाबाद द्विशतक ठोकत निवड समितीला प्रत्त्युत्तर दिले.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आज मुंबईचा सामना पुदुच्चेरीविरोधात सुरु आहे. यात पुदुच्चेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी पुदुच्चेरीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुदुच्चेरी संघाने तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला. पण त्यांना पृथ्वी शॉला बाद करण्यात अपयश आले.

पृथ्वी शॉ यानं १५२ चेंडूचा सामना करताना नाबाद २२७ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ३१ चौकार ५ षटकार लगावले. शॉ यानं १४२ व्या चेंडूवर आपले द्विशतक पूर्ण केले. तर सुर्यकुमार यादव यानं अवघ्या ५८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २२ चौकार आणि ४ षटकार लगावले. पृथ्वी आणि सुर्यकुमार यादव यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५७ धावांचा डोंगर उभा केला.

अशी कामगिरी करणारा शॉ चौथा भारतीय -

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्याही आता पृथ्वीच्या नावावर झाली आहे. पृथ्वीने केरळच्या संजूचा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा - IND VS ENG : इंग्लंडची भारतात दुसऱ्यांदा निच्चांकी धावसंख्येची नोंद

हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : भारत पहिल्या दिवसाअखेर ३ बाद ९९, रोहितचे नाबाद अर्धशतक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.