जयपूर - भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर युवा फलंदाज पृथ्वी शॉ यानं विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळताना नाबाद द्विशतक झळकावले. या खेळीसह त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आज मुंबईचा सामना पुदुच्चेरीविरोधात सुरु आहे. यात पुदुच्चेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पृथ्वी शॉ यानं पुदुच्चेरीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुदुच्चेरी संघाने तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला. पण त्यांना पृथ्वी शॉला बाद करण्यात अपयश आले. पृथ्वीने १५२ चेंडूत नाबाद २२७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३१ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
-
RECORD ALERT 👍👍
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Prithvi Shaw, after scoring 227* vs Pondicherry in the @Paytm #VijayHazareTrophy, now has the highest List A score by a captain in Men's cricket. 👏👏 #CAPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match 👉 https://t.co/udXu4rr12o pic.twitter.com/PVjGu9XBka
">RECORD ALERT 👍👍
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2021
Prithvi Shaw, after scoring 227* vs Pondicherry in the @Paytm #VijayHazareTrophy, now has the highest List A score by a captain in Men's cricket. 👏👏 #CAPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match 👉 https://t.co/udXu4rr12o pic.twitter.com/PVjGu9XBkaRECORD ALERT 👍👍
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 25, 2021
Prithvi Shaw, after scoring 227* vs Pondicherry in the @Paytm #VijayHazareTrophy, now has the highest List A score by a captain in Men's cricket. 👏👏 #CAPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match 👉 https://t.co/udXu4rr12o pic.twitter.com/PVjGu9XBka
पृथ्वीचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठरले. तसेच स्थानिक एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पृथ्वी हा भारताचा एकूण आठवा फलंदाज ठरला. याशिवाय पृथ्वीने संजू सॅमसनला (२१२) मागे टाकत भारतीय स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला.
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वी शॉची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. मात्र तिथे त्याला आपली छाप सोडता आली नाही. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या माध्यमातून शॉ याला आणखी एक संधी मिळाली. तिथेही तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतून त्याला डच्चू देण्यात आला होता. संघाबाहेर गेल्यानंतर पृथ्वी शॉ यानं आक्रमक फलंदाजी करताना, नाबाद द्विशतक ठोकत निवड समितीला प्रत्त्युत्तर दिले आहे.