ETV Bharat / sports

भुवनेश्नर कुमारच्या जागी 'या' खेळाडूने मिळवले हैदराबाद संघात स्थान

''दुखापतीमुळे भुवनेश्वर आयपीएल २०२०मधून बाहेर पडला आहे. आम्ही तो लवकर बरा व्हावा अशी आशा व्यक्त करतो. उर्वरित आयपीएल मोसमासाठी पृथ्वी राज यारा बदली खेळाडू म्हणून संघात सामील होईल'', असे हैदराबादने ट्विटमध्ये म्हटले आहे.

prithvi raj yarra will replace bhuvneshwar kumar for srh in ipl 2020
भुवनेश्नर कुमारच्या जागी 'या' खेळाडूने मिळवले हैदराबाद संघात स्थान
author img

By

Published : Oct 6, 2020, 5:18 PM IST

दुबई - सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे स्नायू दुखावले असून तो आयपीएलमधून बाहेर झाला. दरम्यान, भुवीच्या यंदा होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाण्याच्या आशाही धूसर होण्याची शक्यता आहे. हैदराबादने भुवनेश्वरबदली खेळाडू म्हणून पृथ्वी राज याराची निवड केली आहे.

prithvi raj yarra will replace bhuvneshwar kumar for srh in ipl 2020
पृथ्वी राज यारा

भुवनेश्वरच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याबद्दल हैदराबादने ट्विट केले. ''दुखापतीमुळे भुवनेश्वर आयपीएल २०२०मधून बाहेर पडला आहे. आम्ही तो लवकर बरा व्हावा अशी आशा व्यक्त करतो. उर्वरित आयपीएल मोसमासाठी पृथ्वी राज यारा बदली खेळाडू म्हणून संघात सामील होईल'', असे हैदराबादने ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Update 🚨

    Bhuvneshwar Kumar is ruled out of #Dream11IPL 2020 due to injury. We wish him a speedy recovery!

    Prithvi Raj Yarra will replace Bhuvi for the remainder of the season.#OrangeArmy #KeepRising

    — SunRisers Hyderabad (@SunRisers) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भुवनेश्वर कुमारला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. तो डावाच्या १९व्या षटकात पहिला चेंडू टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला होता. सामना संपल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. यात भुवीच्या मांडीचे स्नायू दुखावल्याचे दिसून आले. यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

आयपीएलमध्ये पृथ्वी यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्याने हैदराबादविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने कोलकाताकडून २ सामने खेळले असून एका फलंदाजाला बाद केले होते. मध्यमगती गोलंदाज असलेला पृथ्वी राज यारा आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळतो. त्याने आत्तापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९ बळी घेतले आहेत. त्याने ३ टी-२० सामने खेळले असूव ४ विकेट्स घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.