अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियमचे उद्घाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम होते, परंतु उद्घाटनानंतर त्याचे नामांतर करण्यात आले असून या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आहेत खास सुविधा -
नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम आधुनिक खेळांच्या सुविधांनी सुसज्ज आहे. या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, ऑलिम्पिक स्तरीय जलतरण तलाव, इनडोअर अकादमी, खेळाडूंसाठी चार ड्रेसिंग रूम आणि फूड कोर्ट आहेत. याशिवाय या मैदानात एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंना चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. खेळाडू रात्रीच्या वेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील.
जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. हे स्टेडियम 63 एकर क्षेत्रात पसरलेले असून या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.
स्टेडियमचे नुतनीकरन झाल्यानंतर प्रथमच येथे सामना खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात हा सामना होत आहे.
हेही वाचा - IND vs ENG : इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
हेही वाचा - सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलले, आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवे नाव