ETV Bharat / sports

जपान ओपन : आपल्याच जोडीदाराला हरवत प्रणॉयचा विजयारंभ - hs prannoy

प्रणॉयचा जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धे­त सलामीचा सामना किदम्बी श्रीकांतसोबत झाला.

जपान ओपन : आपल्याच जोडीदाराला हरवत प्रणॉयचा विजयारंभ
author img

By

Published : Jul 24, 2019, 4:44 PM IST

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने आपल्याच जोडीदाराला हरवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धे­त विजयारंभ केला. प्रणॉयने भारताच्याच किदम्बी श्रीकांतचे या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.

प्रणॉयचा या बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीचा सामना किदम्बी श्रीकांतसोबत झाला. या सामन्यात प्रणॉयने त्याला १३-२१, २१-११, २२-२० असे हरवले. श्रीकांतने पहिलाच गेम आपल्या नावावर केल्यानंतर पुढे त्याला सातत्य राखता आले नाही. त्यानंतरच्या पुढच्या दोन गेममध्ये प्रणॉयने सरशी साधत सामना आपल्या खिशात घातला.

हा सामना एक तासापर्यंत रंगला होता. यापूर्वी, श्रीकांत आणि प्रणॉय पाच वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये श्रीकांतने चार वेळा विजय मिळवला आहे.

Intro:Body:

prannoy beat srikanth in japan open

japan open, srikanth, hs prannoy, badminton championship

जपान ओपन : आपल्याच जोडीदाराला हरवत प्रणॉयचा विजयारंभ

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने आपल्याच जोडीदाराला हरवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धे­त विजयारंभ केला. प्रणॉयने भारताच्याच किदम्बी श्रीकांतचे या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.

प्रणॉयचा या बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीचा सामना किदम्बी श्रीकांतसोबत झाला. या सामन्यात प्रणॉयने त्याला १३-२१, २१-११, २२-२० असे हरवले. श्रीकांतने पहिलाच गेम आपल्या नावावर केल्यानंतर पुढे त्याला सातत्य राखता आले नाही. त्यानंतरच्या पुढच्या दोन गेममध्ये प्रणॉयने सरशी साधत सामना आपल्या खिशात घातला.

हा सामना एक तासापर्यंत रंगला होता. यापूर्वी, श्रीकांत आणि प्रणॉय पाच वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये श्रीकांतने चार वेळा विजय मिळवला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.