ETV Bharat / sports

''क्षेत्ररक्षणाच्या वेळी तुम्ही वाचवलेल्या धावा मोजायला खूप दिवस लागतील''

मोदींनी लिहिले, "१५ ऑगस्ट रोजी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात कठीण निर्णय घेतला. मला 'निवृत्ती' हा शब्द वापरायचा नाही. कारण निवृत्त होण्यासाठी तुम्ही खूप तरुण आणि उत्साही आहात. क्रिकेटच्या मैदानावरील अतिशय संस्मरणीय प्रवासानंतर, आपण आपल्या जीवनाच्या दुसर्‍या डावाची तयारी करत आहात. आगामी पिढ्यांना तुम्ही फक्त चांगला फलंदाज म्हणून नव्हे, तर एक उपयुक्त गोलंदाज म्हणूनही तुमची भूमिका विसरता येणार नाही. कर्णधारांचा विश्वास असेलले तुम्ही एक गोलंदाज आहात. तुमचे क्षेत्ररक्षण लाजवाब होते. या काळातल्या काही उत्तम आंतरराष्ट्रीय झेलवर तुमची छाप आहे. तुम्ही वाचवलेल्या धावा मोजायला बरेच दिवस लागतील. "

pm narendra modi wrote a letter to suresh raina after his cricket retirement
''क्षेत्ररक्षणाच्या वेळी तुम्ही वाचवलेल्या धावा मोजायला खूप दिवस लागतील''
author img

By

Published : Aug 21, 2020, 12:19 PM IST

नवी दिल्ली - 'मिस्टर आयपीएल' नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. १५ ऑगस्टच्या सायंकाळी त्याने धोनीच्या निवृत्तीपाठोपाठ स्वत: ची निवृत्ती जाहीर केली. निवृत्त झालेल्या धोनीला पंतप्रधान मोदींनी पत्र लिहिले होते. आता मोदींनी रैनालाही एक पत्र लिहिले आहे. हे पत्र रैनाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले.

मोदींनी लिहिले, "१५ ऑगस्ट रोजी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात कठीण निर्णय घेतला. मला 'निवृत्ती' हा शब्द वापरायचा नाही. कारण निवृत्त होण्यासाठी तुम्ही खूप तरुण आणि उत्साही आहात. क्रिकेटच्या मैदानावरील अतिशय संस्मरणीय प्रवासानंतर, आपण आपल्या जीवनाच्या दुसर्‍या डावाची तयारी करत आहात. आगामी पिढ्यांना तुम्ही फक्त चांगला फलंदाज म्हणून नव्हे, तर एक उपयुक्त गोलंदाज म्हणूनही तुमची भूमिका विसरता येणार नाही. कर्णधारांचा विश्वास असेलले तुम्ही एक गोलंदाज आहात. तुमचे क्षेत्ररक्षण लाजवाब होते. या काळातल्या काही उत्तम आंतरराष्ट्रीय झेलवर तुमची छाप आहे. तुम्ही वाचवलेल्या धावा मोजायला बरेच दिवस लागतील. "

या पत्रासाठी रैनाने मोदींचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, "जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा आपण आपले रक्त आणि देशासाठी घाम गाळतो. या देशातील लोकांच्या प्रेमापेक्षा इतर कोणती प्रेरणा नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान तुमच्यासाठी असे उद्गार काढत असतील तर, ही एक मोठी गोष्ट आहे. नरेंद्र मोदीजी, तुमच्या प्रेरणादायक शब्दांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. जय हिंद. "

  • When we play, we give our blood & sweat for the nation. No better appreciation than being loved by the people of this country and even more by the country’s PM. Thank you @narendramodi ji for your words of appreciation & best wishes. I accept them with gratitude. Jai Hind!🇮🇳 pic.twitter.com/l0DIeQSFh5

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२७ नोव्हेंबर १९८६रोजी मुरादनगर येथे रैनाचा जन्म झाला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले होते. रैनाने चेन्नई सुपर किंग्ज, आशिया इलेव्हन, भारत, झारखंड, रायजिंग पुणे सुपरजायंट आणि इंडिया अ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रैनाचे वडील काश्मीरचे तर आई हिमाचल प्रदेशची आहे. मात्र, काही अडचणींमुळे, रैनाचे कुटूंब गाझियाबादला स्थलांतरित झाले. रैनाने २००५मध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.

टी-२० आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. रैनाने २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत. २०१७पासून तो भारतीय संघाबाहेर होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.